""ज्ञानदीप अभ्यासिका""

गोंदिया जिल्हा "पोलीस दादालोरा खिडकी योजना" "एक हाथ मदतीचा योजने अंतर्गत" स्तुत्य उपक्रम
""ज्ञानदीप अभ्यासिका वास्तूचे"" नूतनीकरण व लोकार्पण----सोहळा संपन्न.
🔹.... पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे संकल्पनेतून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील नक्षल प्रभावित दुर्गम- अतिदुर्गम भागांतील जनतेकरिता विशेषतः ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी युवक -युवती यांच्या विकासासाठी, आणि त्यांच्या भवितव्यासाठी "पोलीस दादालोरा एक खिडकी योजना एक हाथ मदतीचा" या योजणेअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून मा. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया, मा. विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्या संकल्पनेतून व प्रेरनेने मान्यवरांच्या उपस्थितीत दि 17/04/2025 रोजी गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे संचलित पोलीस उप मुख्यालय देवरी येथे सर्व सोयी सुविधायुक्त, सुसज्ज अशा "ज्ञानदीप अभ्यासिकेचे" नुतनीकरण व "सब्सीडरी कॅन्टीनचे" उद्घाटन सोहळा उत्साहात पार पाडण्यात आले....
या सोहळ्याचे उद्घाटन माननीय श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या हस्ते व मा. श्री. नित्यानंद झा,अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया तसेच मा. श्री. विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांच्या उपस्थित पार पडला.
विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि प्रेरणादायी अभ्यासाचे वातावरण मिळावे, या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने "दादालोरा खिडकी" योजने अंतर्गत ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. अभ्यासिकेमध्ये वाचनासाठी आवश्यक पुस्तक संपदा, प्रशस्त बैठक व्यवस्था, पंखे, लाईट्स यांची पुरेशी सोय करण्यात आली आहे.